Shivajirao Adhalrao Join ncp : महायुतीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता.कारण शिरूरच्या जागेवर अजित पवारांनी दावा केला होता. त्या अनुषंगाने आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. | Shivajirao Adhalrao Join ncp
आढळराव हे शिरूर लोकसभेतून हॅट्रिक विजेते खासदार राहिलेले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला होता. सध्या कोल्हे हे शरद पवारांसोबत असल्यामुळे ही जागा महायुतीतील अजित पवारांना मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात होत.
आढळराव हे ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले होते. मात्र शिरूरची जागा अजित पवारांना गेल्याने आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आता आढळराव विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत पुन्हा एकदा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. \ Shivajirao Adhalrao Join ncp
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अखेर आढळरावांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. | Shivajirao Adhalrao Join ncp