शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळे – अदित्य ठाकरे

नवी दिल्ली – हिंदुत्व ही शिवसेनेची एक तत्वप्रणाली आहे पण आमचे हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते अदित्य ठाकरे यांनी केले आहे. गुरमेहेर कौर यांनी देशातील तरूण राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेऊन एक पुस्तक लिहीले आहे त्या पुस्तकात दिलेल्या मुलाखतीत अदित्य ठाकरे यांनी हे प्रतिपादन केले आहे.

ते म्हणाले की, आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून आम्ही उजव्या विचारसरणीचे मानले जात असलो तरी आम्ही त्यात मध्यममार्गी (सेंटरीस्ट) आहोत. आमचे हिंदुत्व प्रागतिक आहे. म्हणूनच आम्ही नाईट लाईफ, इलेक्‍ट्रीक बसेस, आणि प्लॅस्टिक प्रदुषण इत्यादी विषयांवर आपली भूमिका मांडत असतो. लोकांना देशद्रोही ठरवणे, जमावाकडून लोकांची हत्या करणे अशा प्रकारांच्या बाबतीत आम्ही भाजपपेक्षा वेगळे आहोत असेही त्यांनी यात नमूद केले आहे.

तुमच्या सरकारला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार लोकांना असला की सरकारने धर्माविषयी चिंता करण्याचे काही कारण नाहीं. सरकारचे काम हे त्यांनी प्रशासन चालवणे आहे. धर्माची चिंता संबंधीत राजकीय पक्ष त्यांच्यात्यांच्या राजकीय विचारसरणीनुसार करतील असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×