मुंबई – बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत निष्ठावान, त्यांच्यासाठी जेवण तयार करणारे चरणसिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश नेल्यानंतर उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले मिलिंद नार्वेकर हे देखील शिंदे गटातील जाणाऱ असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. या सर्व अफवा असून त्या कोण पसरवत हे माहित नसल्याची प्रतिक्रिया गोऱ्हे यांनी दिली आहे.
नार्वेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत गोऱ्हे म्हणतात, मिलिंद नार्वेकर असं काही करतील, असं मला वाटत नाही. माझं हे मत आहे.काही वेळा एखादं छोटंसं कुत्र्याचं पिल्लूही असतं. त्याला लाथ मारल्यानंतरही ते इथे – तिथे फिरून लोकांना डिस्टर्ब करत असत,एक महिन्यात काही झालं नाही,ते सांगतात होणारे तर कधी होणार हे सांगावं त्यांनी, उगाचच अशा प्रकारच्या अफवा पसरवणं काही योग्य नाही असं स्पष्ट मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे.
उद्धव ठाकरेंचे राईट हँड अशी मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे. आपल्याबाबतच्या अफवा सुरु झाल्यानंतर नार्वेकर यांनी एक ट्विट देखील केलं होत. परंतु राजकीय वर्तुळात त्यांच्या शिंदे गटात जाण्याबाबतच्या चर्चा मात्र काही केल्या थांबताना दिसत नव्हत्या.