“शिवसेना चिटस्‌ महाराष्ट्र” हॅशटॅगचा ट्‌विटरवर ट्रेंड

मुंबई : लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या निर्णयावर सोशलमीडियातून प्रचंड नाराजी व्यक्‍त होताना दिसत आहे. त्यासाठी नेटकऱ्यांनी शिवसेना चिटस्‌ महाराष्ट्र हा हॅशटॅगचा ट्‌विटरवर ट्रेंड सुरू केला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला असून राज्यात अजून स्थिर सरकार आले नाही. तसेच भाजपनेदेखील आपण सत्तास्थापण करण्यासाठी असमर्थ असल्याचे सांगत सत्ता स्थापनेचा चेंडू शिवसेनेच्या गोटात टाकला आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार अशा हट्टाला पेटलेल्या शिवसेनेला आता सोशलमिडीयातून विरोधास सामोरे जावे लागत आहे. कारण राज्यातील जनेतेन निवडणुकीतून सेना-भाजपच्या युतीला बहुमताने निवडून दिले आहे. मात्र, आता एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत सेनेने महाराष्ट्राची फसवणूक केली असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.


शिवसेना चिटस्‌ महाराष्ट्र या हॅशटॅगच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्‍त केली आहे. काही यासाठी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जूने व्हिडीओ पोस्ट करून भाजप आणि सेनेच्या युतीविषयीचे मत काय होते याची आठवण करून दिली आहे.

तर काहींनी सेनेने जनादेशाचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता या सर्वांमध्ये आज शिवसेना नेमका काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे.

 

 

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.