मुंबई : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करीत आपल्या समर्थक आमदारांसह आधी सुरत आणि नंतर आसाममधील गुवाहाटी गाठले. सध्या आसाममध्ये पूरस्थिती असताना महाराष्ट्राचे बंडखोर नेते तिथे तळ ठोकून बसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, ”आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय” . असे ट्विट त्यांनी केले आहे.
आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.#ShivsenaMaharashtraWithAssam
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2022
आज आसाम मधील रॅडिसन हॉटेलमधला मुक्काम बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी हलवला असून. आता हा गट गोव्यातील कामाक्षी देवीच्या दर्शनासाठी गेल्याची माहिती मिळते आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 50 आमदार असल्याच्या दावा केला आहे. तर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून त्यांनी बहुमत सिद्ध करावं असं चॅलेंज देण्यात आलं आहे. शिवाय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्या दिनांक ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश सरकारला दिले आहे.