मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) त्याच्या ‘UT 69’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे राज कुंद्रा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मात्र सध्या राज आणि शिल्पाची एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चा रंगली आहे. राज आणि शिल्पा विभक्त होणार असल्याचे म्हंटले जात आहे. राजने एक ट्वीट शेअर केले आहे. ज्यामुळे हे दोघे विभक्त होणार असल्याची शंका चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
राज कुंद्राने ट्वीट करत लिहीले की, “आम्ही वेगळे झालो आहोत आणि या कठीण काळात तुम्ही आम्हाला वेळ द्यावा ही विनंती”. राजने या ट्वीटचा फोटो त्याच्या इंस्टा स्टोरीमध्येही शेअर केला आहे.या पण पोस्टमध्ये अभिनेत्याने कोणाचं नाव घेतलेलं नाही. पण तरीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विभक्त होणार का? असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.
यावरून नेटकऱ्यांनी ‘राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी वेगळे होणार का?’, ‘हा पब्लिसिटी स्टंट आहे’, ‘राज नक्कीच त्याच्या मास्कबाबत बोलत असणार,’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र शिल्पा आणि राज विभक्त होणार असल्याच्या चर्चांबाबत त्यांच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
We have separated and kindly request you to give us time during this difficult period 🙏💔
— Raj Kundra (@onlyrajkundra) October 19, 2023
दरम्यान, नुकताच ‘UT69’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये राज कुंद्रा एका पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात जाताना दिसणार आहे. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात राजचा अनुभव कसा होता हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या 3 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.