मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. अभिनयासह ती तिच्या फिटनेससाठी देखील अधिक ओळखली जाते. ‘बाजीगर’ या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र तिचा पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणावर एक चित्रपट बनणार आहे. हा त्याचा बायोपिक असणार आहे. परंतु या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील काम करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत तिने स्वत: एका मुलाखतीत माहिती दिली आहे.
शिल्पा म्हणाली की, “यात माझी कोणतीही भूमिका नाही जी मी तुम्हाला सांगू शकेन. “शिल्पाच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले की अभिनेत्री राज कुंद्राच्या बायोपिकमध्ये दिसणार नाही. मात्र आता या चित्रपटात शिल्पा नाही तर मग कोणती अभिनेत्री असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या बायोपिकमध्ये राज मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटात राजचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
चित्रपटाच्या कथेत राज यांचा आर्थर रोड जेलचा अनुभवही दाखवण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. त्याने तिथे कसा वेळ घालवला, हे सर्व या चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर दिग्दर्शनापासून स्क्रिप्टिंगपर्यंत राज कुंद्रा या चित्रपटात पूर्णपणे सहभागी होणार आहे.
काय आहे पॉर्न रॅकेट प्रकरण?
राज कुंद्रावर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रासह 10 जणांवर कारवाई करण्यात आली. राजच्या अटकेपूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली होती. हे आरोपी पॉर्न फिल्म्स बनवायचे आणि फिल्म्स आणि वेब सिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करायचे.