आपल्या पतीपासून वेगळे राहण्याचा विचार शिल्पा शेट्टी करायला लागली आहे. शिल्पाच्या एका मैत्रिणीने याबाबतची माहिती दिली आहे. नवरा राज कुंद्राला अश्लील फिल्मस बनवण्याच्या
आरोपात तुरुंगात टाकल्यावर शिल्पाने आता दोन्ही मुलांना घेऊन वेगळे राहण्याचा विचार सुरू केला आहे. राज कुंद्राच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही लक्षणे सध्या दिसत नाहीत. उलट या अडचणी दिवसेंदिवस वाढायला लागल्या आहेत.
राज कुंद्रा अश्लील सिनेमांच्या उद्योगात गुंतला असल्याचे समजल्यावर जेवढा धक्का इतर सर्वजणांना बसला तेवढाच शिल्पालाही बसला आहे. इतके दिवस जी ऐषारामाची लाइफस्टाइल एन्जॉय करते आहे, ती राज कुंद्राच्या या उद्योगाच्या जोरावर होती,
हे सत्य पचवणे शिल्पाला जड जाते आहे. वाईट कामातून मिळालेल्या पैशांपासून आपल्या दोन्ही मुलांना दूर ठेवावे असे आता तिला वाटायला लागले आहे. आता राज कुंद्राच्या एका पैशालाही हात लावायचा नाही, असे तिने ठरवून टाकले आहे.
रिऍलिटी शोचे जज म्हणून याशिवाय “हंगामा 2′ आणि “निकम्मा’ या दोन सिनेमांनंतर आता तिला आणखीन रोलदेखील मिळण्याची संधी आहे. म्हणजे शिल्पाला नवऱ्याच्या पैशावर अवलंबून राहायला लागणार नाही.