मुंबई – फिटनेस फ्रिक असलेली अभिनेत्री ‘शिल्पा शेट्टी’ सध्या मोठ्या स्क्रिनपासून दूर असली तरी ती मोठं मोठ्या इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसते. अशाच एका इव्हेंटमध्ये शिल्पा शेट्टीने हजेरी लावली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या कार्यक्रमात सोनम कपूर, शिल्पा शेट्टी कुंद्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील दिसून आले होते. मात्र, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने विशेष लक्ष वेधलं असल्याचं यावेळी दिसून आलं. या कार्यक्रमात सेलेब्ससाठी व्हाइटची फॅशन सामान्य होती.
यावेळी सर्वांनीच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. शिल्पा शेट्टीने यावेळी एक साडी निवडली होती. तिने पांढऱ्या, सॅटिनच्या ड्रेपचा जड राखाडी ब्लाउज घातलेला, ज्यामध्ये ती तिच्या मोकळ्या केसांमध्ये एका अप्सरापेक्षा कमी दिसत न्हवती.
यावेळी शिल्पा अतिशय मादक आणि सुंदर दिसत होती. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचे या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. सर्वांनीच अभिनेत्रीच्या या खास लुकचे कौतुक केले आहे.
दरम्यान, वर्क फ्रंटवर बोलायचे झाल्यास शिल्पा लवकरच रोहित शेट्टीसोबत भारतीय पोलिसांचा एक भाग बनताना दिसणार आहे. ‘इंडियन पोलीस फोर्स’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून, यामध्ये अभिनेत्री शिवाय सिद्धार्थ मल्होत्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.