शिक्रापूर ग्रामपंचायतीचे झाले वाहनतळ

कार्यालयासमोर वाहने लावण्यास बंदीची मागणी

शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथे प्रशस्त ग्रामपंचायत इमारतीच्या आवारात दररोज असंख्य चारचाकी व दुचाकी वाहनांचे पार्किंग केली जात आहे. ग्रामपंचायत आवारासह गावामध्ये जाण्यास अडथळे निर्माण होत आहे. पार्किंग होत असलेली वाहने बंद करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे.

येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशस्त ग्रामपंचायत इमारतीसमोर असेलल्या मोठ्या जागेमध्ये दररोज परिसरातील व्यावसायिक तसेच नोकरदार, कामगार यांसह आदी नागरिक वाहनांचे पार्किंग करीत आहे. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि शेजारी असलेल्या शाळेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक, ग्रामस्थांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे, तर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्यामुळे शाळेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना व पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांना ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात आल्यानंतर वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणारीपार्किंग बंद करण्याची मागणी निवृत्ती काळोखे यांनी सरपंच जयश्री भुजबळ व ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांच्याकडे केली आहे, ज्या व्यक्‍तींची वाहने ग्रामपंचायत आवारात लावली जात आहेत. त्यांना समज दिली जाईल. पार्किंग बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना केल्या जातील, असे सरपंच जयश्री भुजबळ व ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी सांगितले.

पदाधिकाऱ्यांची वाहने रस्त्यावर
ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वाहने लावली जात आहे. यामुळे संपूर्ण जागा वाहनांनी व्यापली जात असल्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांना त्यांची वाहने रस्त्यावर लावण्याची वेळ येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.