मुंबई – बॉलिवूडचा दिग्गज लेखक, दिग्दर्शक व निर्माता अपूर्व असरानी अलीकडे एक शॉकिंग खुलासा केला. गेल्या 13 वर्षांपासून रिलेशनशिपबद्दलची एक गोष्ट अपूर्वने लपवून ठेवली होती. पण अखेर 13 वर्षांनंतर त्याने खुलासा केलाच. सोशल मीडियावर त्याने आपल्या गे पार्टनर सिद्धांतसोबतचा एक फोटो शेअर करत त्याने त्याच्यासोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली.
Truly overwhelmed by and grateful for all this love coming our way. @Apurvasrani and I have only ever followed our hearts and taken things head-on without giving much thought to naysayers. https://t.co/nKOQxDhrrw
— Sid Pil (@SidPill) May 30, 2020
ट्विट केले आहे की,’गेल्या १३ वर्षांपासून आम्ही एकत्र राहत आहोत. मात्र कायम आम्हाला भावंड असल्यासारखं वावरावं लागत होतो. घर भाड्याने मिळावं यासाठी आम्हाला भाऊ असल्याचं नाटक करावं लागत होतं. तसंच शेजारील लोकांना आमच्या नात्याविषयी कळू नये त्यामुळे कायम आम्हाला घराचे पडदे लावून ठेवायला सांगत असतं. मात्र काही काळापूर्वीच आम्ही दोघांनी स्वत:च घर घेतलं आहे. त्यामुळे आता आम्ही स्वत:हून लोकांना आमच्या नात्याविषयी सांगतो.
Since I moved out of the city 2 years ago, my day begins at 7am. I sit in the balcony overlooking the fields & I sip my magic potion tea (takes half n hour to brew). It is always very quiet, save for a gentle windchime. This allows me to gather my thoughts before I begin writing. pic.twitter.com/QIIGKLtDV6
— Apurva (@Apurvasrani) May 25, 2020
तो पुढे म्हणाला, ‘आम्ही एकमेकांचे पार्टनर आहोत हे बिंधास्त सांगतो. हिच ती वेळ आहे जेव्हा LGBTQ मधील नागरिकांना समाजात वावरण्याचा दर्जा मिळेल”, असं ट्विट अपूर्वने केलं आहे. दरम्यान, अपूर्व कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आहे. त्याने ‘सत्या’, ‘शाहिद’, ‘सिटीलाइट्स’, ‘अलिगढ’, ‘सिमरन’ या चित्रपटांचं लेखन केलं आहे.