मुंबई – आयोनॅक्स लेझर आणि पीव्हीआर या कंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे भारतामध्ये चित्रपट दाखविणारी सर्वात मोठी कंपनी आकारास येणार आहे. त्यामुळे सोमवारी या दोन्ही कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
आयोनॅक्स लेझर या कंपनीचा शेअर 11 टक्क्यांनी वाढून 522 रुपयांवर गेला. तर पीव्हीआर कंपनीचा शेअर तीन टक्क्यांनी वाढून 1,883 रुपयांवर गेला. आता या दोन्ही कंपन्यांचे एकत्रित मिळून देशभरामध्ये दीड हजार थिएटर होणार आहेत.
करोनाच्या काळात चित्रपट दाखविणाऱ्या कंपन्यांवर परिणाम झाला होता. त्याचबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चित्रपटाच्या गल्ल्यावर परिणाम होत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या असल्याचे सांगितले जाते. विलीनीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पीव्हीआरच्या 30 शेअरमध्ये आयोनॅक्स लेझरचे दहा शेअर मिळणार आहेत.