Share Market Update : सध्या देशांतर्गत शेअर बाजाराला दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत. बुधवार नंतर आज गुरुवारी देखील सलग दुसऱ्यादिवशी बाजार तोट्याच्या मार्गावर आहे. आजही सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 850 अंकांपर्यंत घसरला आहे. प्री-ओपन सत्रात बाजार विखुरलेला दिसत होता. प्री-ओपन सत्रात, बीएसई सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला होता, तर एनएसई निफ्टी सुमारे 160 अंकांनी घसरला होता.
निफ्टी टॉप लूजर्समध्ये, एलटीआय माईंडट्री 9.55 टक्क्यांनी घसरला. पॉवर ग्रीडमध्ये 2.56 टक्क्यांची घसरण दिसून आली. बुधवारी कामकाजाच्या अखेरिस शेअर बाजारात 1600 अंकांपेक्षा अधिक घसरण दिसून आली होती. यावरून बाजारातील घसरण सध्या तरी आटोक्यात येणार नसल्याचे संकेत मिळत होते.
सकाळी शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी 0.50 टक्क्यांहून अधिक तोट्यात होते. बुधवारी निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रत्येकी 4 टक्क्यांहून अधिक घसरले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून बाजारात घसरण सुरू आहे. बुधवारी दीड वर्षातील सर्वात मोठी घसरण बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये दिसून आली होती.
HDFC बँकेच्या शेअरमध्ये घसरण
दुसरीकडे, HDFC बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारीही घसरण दिसून आली. तर एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये 2.69 टक्क्यांची, एसबीआय लाइफच्या शेअरमध्ये 2.25 टक्क्यांची घसरण झाली. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्सवर 4 टक्क्यांहून अधिक घसरला होता. एशियन पेंट्सचे शेअर्स साडेतीन टक्क्यांहून अधिक तोट्यात होते.
एचडीएफसी बँक काल 8 टक्क्यांनी घसरल्यानंतर आज 2 क्क्यांनी घसरली. तर विप्रो, एचसीएलटेक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह सारखे शेअर्स 1 ते 2 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, बाजाराला टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल यांसारख्या शेअरकडून काही प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.