shard pawar : मुंब्र्यातील (Mumbra Shakha) शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले. शिंदे गटाने मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर त्याठिकाणी तात्पुरती नवीन कंटेनर शाखा उभारली गेली.
या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी तिथे शिंदे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटाच मोठा तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, आता या सगळ्या घटनेवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (shard pawar) यांनी दोन शब्दात आपली भूमिका मांडली आहे. “शाखा तोडण्याची भूमिका योग्य नाही…’ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आणि दिवाळीच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग या ठिकाणी पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येत असतात. यंदाही सर्व पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केलं.
“न्यायालयात जाऊन कायदेशीर..” मुंब्रा शाखा प्रकरणी संजय राऊत यांचा इशारा…
शिंदे गटाने मुंब्रा येथे गेली 25 वर्षे अस्तित्वात असलेली शिवसेना शाखा बुलडोझरचा वापर करून पाडून टाकली आहे, या प्रकरणी आम्ही आता न्यायालयात जाऊन कायदेशीर कारवाई करू असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे तिथे पोहोचले तेव्हा सगळे रस्त्यावर आले होते. जर तुम्ही पोलिसांचा वापर केला नसता तर आम्ही ही शाखा ताब्यात घेतली असती.आज पोलिस तुमचे गुलाम आहेत, उद्या तेच पोलिस आमच्या आदेशाचे पालन करतील, मग तुम्ही काय कराल? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.