Vivo ने अखेर Vivo X100 आणि Vivo X100 Pro मॉडेल्स लाँच केले आहे. मागील अनेक दिवसांपासून या फोनची प्रतीक्षा केली जात होती. अखेर हे दमदार दोन फोन बाजारात दाखल झाले आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चिपसेट. MediaTek Dimension ९३०० chipset ला सपोर्ट करणारे हे जगातील पहिले फोन आहेत.
ह्या फोनमध्ये ६.७८ इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि ५०मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. बॅटरी स्पेक्स मात्र वेगळे आहेत. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२०हर्ट्झ आहे. त्याचबरोबर ह्या डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस ३००० nits की आहे. यात १६जीबी पर्यंत RAM आणि १टीबी पर्यंत स्टोरेज मिळते. स्टँडर्ड व्हर्जन मध्ये फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे, तर प्रो मॉडेल कर्व्ड एजसह येतो. दोन्ही फोन MediaTek Dimensity ९३०० प्रोसेसरसह आहेत.
कलर – दोन्ही फोनमध्ये चार कलर ऑप्शन सादर करण्यात आले आहेत. ज्यात Star Trail Blue, Sunset Orange, White Moonlight आणि Cheyne Black चा समावेश आहे.
कॅमेरा – फोटोग्राफीसाठी दोन्ही फोनमध्ये ५०मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो OISला सपोर्ट करतो. सोबत ५०मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर, ६४मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेन्सर आहे, ज्यात ३एक्स आणि १००एक्स डिजिटल झूम सपोर्ट मिळतो. प्रो मॉडेलमध्ये ५०मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये ३२मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
बॅटरी – Vivo X100 मध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी १२०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर Vivo X100 Pro मध्ये ५,४००एमएएचची बॅटरी देण्यात आली असून ती १००वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर प्रो व्हेरिएंटमध्ये ५०वॉट वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे.
किंमत – कंपनीने Vivo X100 सीरीज सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. Vivo X100 ची किंमत CNY ३,९९९ (४६,३८३ रुपये) पासून सुरु होते. तसेच प्रो व्हेरिएंटची किंमत CNY ४,९९९ (५७,९८० रुपये) इतकी आहेत.