शरद यादव विरोधकांबरोबरच!

नवी दिल्ली – बिहार मधील एक मातब्बर नेते व लोकतांत्रिक जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांनी नितीशकुमारांशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न चालवले असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

बिहार निवडणुकीत जेडीयु-भाजप आघाडीचा पराभव करण्यासाठी आपण विरोधकांना एकत्र आणू असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे. त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावरही एका निवेदनाद्वारे टीका केली आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांवर मोठे आरीष्ट्य आणले असून या सरकारच्या कारभारामुळेच देशातील शेतकरी संकटात सापडला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

आज संपुर्ण देश मोठ्या आर्थिक आव्हानाचा मुकाबला करीत असून केंद्र व राज्यातील सरकारला त्यावर कोणतीही प्रभावी उपाययोंजना करता आलेली नाही असा आरोपही शरद यादव यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.