Rohit Pawar – बारामती अँग्रोमध्ये कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. त्या नंतर ईडीच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नुसार रोहित पवार यांना बुधवारी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
मात्र, या दरम्यान रोहित पवार यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. इतकेच नाही तर या दरम्यान रोहित पवार यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच रोहित पवार यांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्त्वात पक्षात फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार हे चांगलेच आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. पक्षात आपले स्थान मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे.
या ईडी चौकशीदरम्यान देखील रोहित पवार समर्थनांमार्फत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांची देखील ईडी कार्यालयाभोवती गर्दी राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.