WPL Live Cricket Score, GG vs RCB Women’s Premier League 2024 : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 13 वा सामना बुधवारी खेळला केला. महिला प्रीमियर लीगच्या 13व्या सामन्यात गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 19 धावांनी विजय मिळवला. बेथ मूनीच्या नेतृत्वाखालील संघाने मंधानाच्या आर्मीविरुद्ध लीगमधील पहिला विजय नोंदवला. मात्र, गुजरातच्या या विजयामुळे गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही.
विजयासाठी 200 धावांचा पाठलाग करताना मैदाना उतरलेल्या आरसीबीला 20 षटकात आठ गडी गमावून केवळ १८० धावांपर्यत मजल मारता आली. या सामन्यात जॉर्जिया वेअरहॅम व्यतिरिक्त कोणतीही महिला फलंदाज आरसीबीसाठी विशेष कामगिरी करू शकली नाही. तिने 22 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. मात्र, तिला या डावाचे अर्धशतकात रूपांतर करता आले नाही.
For her unbeaten captain’s knock of 85*(51), it’s the Gujarat Giants skipper Beth Mooney who collects the Player of the Match award 🏆
Scorecard 💻📱https://t.co/W8mqrR94WB#TATAWPL | #GGvRCB | @Giant_Cricket pic.twitter.com/DZgGVy3N9m
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 6, 2024
डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या स्मृती मानधना आणि सबिनेनी मेघना यांच्यात 31 धावांची भागीदारी झाली. भारताची स्टार फलंदाज 24 धावा करून बाद झाली. तर मेघनाला चार धावा करता आल्या. या सामन्यात ॲलिस पेरीने 24, सोफी डिव्हाईनने 23, ऋचा घोषने 30, सोफी मोलिनेक्सने तीन आणि सिमरन बहादूरने (नाबाद) एक धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून गोलंदाजीत ॲश्ले गार्डनरने दोन तर कॅथरीन आणि तनुजाने प्रत्येकी एक गडी बाद केला.
WPL 2024 ( #GGvRCB Match 13 ) : लॉरा-मूनींची झंझावती अर्धशतके, गुजरातनं RCB समोर ठेवलं मोठं लक्ष्य…
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्स संघाने 20 षटकांत पाच गडी गमावून 199 धावा केल्या होत्या. सलामीला फलंदाजीला आलेल्या लॉरा वोल्वार्ड आणि बेथ मुनी यांनी स्फोटक फलंदाजी केली. या दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 78 चेंडूत 140 धावांची मोठी भागीदारी झाली. लॉराने 45 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. तर कर्णधार मुनी 85 धावा करून नाबाद राहिली. बेथ मुनीने 51 चेंडूंत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 85 धावा केल्या.
फोबी लिचफिल्डने 17 चेंडूत 18 धावा केल्या. तीला स्मृति मंधाना हिने धावबाद केले. यानंतर गुजरातला एका मागोमाग धक्के बसले. ॲशले गार्डनर पहिल्याच चेंडूवर बाद झाली तर डेलन हेमलता 1 धाव काढत बाद झाली. त्यानंतर बूथ मुनीने एक बाजू संभाळत धावसंख्या 199 पर्यंत नेली. आरसीबीकडून गोलंदाजीत सोफी मोलिनक्स आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर एक फलंदाज धावबाद झाली.