Sharad Pawar | Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही प्रचारासाठी दौऱ्यांच्या माध्यमातून आघाडी घेतली आहे. गुरुवारी सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी पुण्यातील सभेला संबोधित केले होते. त्यानंतर, आज बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार होम ग्राऊंडवर जनतेशी संवाद साधत आहेत.
या सभेदरम्यान, उपस्थितांपैकी एकाने शरद पवार बोलण्यासाठी उभे राहिलेल्या व्यासपीठाकडे एक वस्तू फेकली, ती वस्तू त्यांच्या बॉडीगार्डने कॅच पकडून घेतली. यावेळी, बॉडीगार्डच्या चेहऱ्यावरील हावभावही संतापजनक होते. सध्या या घटनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत असून, मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे.
राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेतेही मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनीही प्रचारासाठी दौऱ्यांच्या माध्यमातून आघाडी घेतली असून, जनतेशी संवाद साधत आहेत.
बारामती येथील सभेतून शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच कन्हेरी गावचा उल्लेख करत गावकऱ्यांची मने जिंकली. गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे आपण निवडणूकीची सुरुवात कन्हेरी येथून करतो असे ते म्हणाले. । Sharad Pawar | Lok Sabha Election 2024