नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दांडी मारली होती. पवारांनी पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यास अनुपस्थिती दर्शविल्यानंतर, त्यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये पाचव्या रांगेमध्ये स्थान देण्यात आल्याने त्यांनी दिल्लीमध्ये असताना देखील या सोहळ्यास उपस्थिती लावणे टाळले अशा आशयाच्या बातम्या देखील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले,’शपथविधीच्या कार्यक्रमात माझी जागा कुठे याची सचिवांनी चौकशी केली होती. तेव्हा ती पाचव्या रांगेत असल्याचं कळालं. पण नंतर परत दुसरीकडे असल्याचं सांगितलं. मला वाद वाढवायचा नाही. एकतर त्यांच्या कार्यालयात त्रुटी असावी किंवा माझ्या कार्यालयात त्रुटी असावी. आता हा विषय फार मोठा नाही तो इथेच संपवला पाहिजे. असेही तेम्हणाले आहे. दरम्यान, महापालिका व लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या झालेल्या सलग दोन पराभवांमुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शहराची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भोसरी येथे सुरु आहे.