शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत वाढ

कोल्हापूर – ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील औरंगाबादच्या केसापुरीचा नववा संशयित आरोपी शरद कळसकर याच्या पोलीस कोठडीत 24 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

कळसकरच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने कोल्हापूर एसआयटीने आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचे समोर हजर केले असता हा निर्णय सुनावण्यात आला.

कळसकर याच्याकडून सात दिवसांमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे त्याला आणखी सात दिवसांची कोठडी द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे आणि विशेष सरकारी वकील ऍड. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयाकडे केली होती.

ही विनंती मान्य करत न्यायालयाने कळसकरच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ केली आहे. तसेच या दरम्यान होणाऱ्या तपासातील प्रगती बाबतचा अहवाल देखील न्यायालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×