पुतण्यासाठी सलमानने केला स्टंट

सलमानचा भाऊ सोहेल खानचा मुलगा योहन नुकताच आठ वर्षांचा झाला. त्याच्या आठव्या वाढदिवसानिमित्त सोहेलच्या घरी खान परिवारातले सगळे सदस्य एकत्र आले होते. योहनसाठी सलमानने एक स्टंट केला आहे. या निमित्ताने सलमानने हा स्टंट केला आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये योहन एका बीनबॅगमध्ये बसलेला आहे. दुसऱ्या बाजूला सोहेल खान बीनबॅगेवर उडी मारतो. त्यामुळे छोटासा योहन हवेत उंच उडतो. तेवढ्यात सलमान खान एन्ट्री घेतो आणि योहनला हवेतच पकडतो.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सलमानने योहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुझ्या वडिलांनी तुला मागून सांभाळले आहे आणि मी तुला पुढे सांभाळतो आहे. पण जास्त उंच उडू नकोस, अशी सूचनाही सलमानने आपल्या लाडक्‍या पुतण्याला केली आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये सलमानच्या अलिकडेच रिलीज झालेल्या सिनेमातले गाणे स्लो मोशनमध्ये वाजताना ऐकू येते. सलमानच्या “भारत’ने 200 कोटींपर्यंत मजल मारली आहे, तर तो “दबंग 3′ आणि “इंशाअल्ला’मध्येही काम करतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.