मुंबई – कपूर घराण्यातील संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरने भलेही बॉलीवूडमध्ये डेब्यू केले नसले तरीही ती सतत कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे चर्चेत आणि प्रसिद्धिच्या झोतात असते. लवकरच शनाया करण जोहरच्या ‘बेधडक’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात कणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शनाया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
स्टार किड शनाया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल अपडेट देत असते. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये शनायाचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला.
View this post on Instagram
यावेळी तिने आपल्या ग्लॅमर्स लूकने सर्वांनाच घायाळ करून सोडले होते. शनायाने तिच्या इन्स्टाग्रामवर या रॅम्प वॉकचा व्हिडीओ पोस्ट केला. मात्र त्यावर नेटकऱ्यांकडून तिच्यावर ट्रोलिंगचा भडीमार केल्याचं दिसून आलं आहे. या कार्यक्रमात तिने पिवळ्या रंगाची सीक्वेन साडी नेसली होती. डिझायनर अर्पिता मेहतासाठी ती शॉ स्टॉपर होती.
या साडीत शनाया कमालीची सुंदर दिसत असली तरी तिचा रॅम्प वॉक नेटकऱ्यांना आवडला नाही. काहींनी तिला प्लास्टिकची बाहुली असं म्हटलंय. तर काहींनी तिला ‘आतापर्यंतचा हा सर्वात वाईट ऱॅम्प वॉक होता…’ म्हणून चिडवण्याचा प्रयत्न केला आहे. शनाया सध्या 23 वर्षांची आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात करिअर करणार आहे.