मुंबई – झी 5 ने त्यांचा आगामी चित्रपट कंजूस मक्खीचुसचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विपुल मेहता यांनी केले आहे.श्वेता त्रिपाठी, पियुष मिश्रा, अलका अमीन, राजीव गुप्ता अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता कुणाल खेमू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
ट्रेलरमध्ये कुणाल खेमू एका कंजूस पात्राची भूमिका साकारताना दिसत आहे. आपल्या कंजूसपणामुळे कुणाल खेमू संपूर्ण उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात प्रसिद्ध असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. कॉमेडी ड्रामा असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. देवापुढे उदबत्ती लावताना देखील कुणाल खेमू कसा करतो हे ट्रेलरमध्ये पाहून तो किती कंजूस आहे हे समजते.
दिग्दर्शक विपुल मेहता यांनी सांगितले की, कंजूस मक्खीचूस ही लखनौमधील एका मध्यमवर्गीय, साध्या मनाच्या पांडे कुटुंबाची कथा आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेला ड्रामा देखील अतिशय नॅचरल आहे.झी 5 वर लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता कुणाल खेमू म्हणाला कंजूस मक्खीचूस हा एक भन्नाट चित्रपट आहे जो प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत पाहायला आवडेल. कारण हा पुरेपूर मनोरंजन करणारा चित्रपट आहे.तसेच दिवंगत कॉमेडी अभिनेते राजू श्रीवास्तव यांनी देखील या चित्रपटात काम केलेलं आहे.हा चित्रपट २४ मार्च रोजी झी 5 वर प्रदर्शित होणार आहे.