मुंबई – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने अलीकडेच दिग्दर्शनात पदार्पण करण्याची घोषणा केली होती, आता आर्यन देखील बिझनेसमन झाला आहे. आर्यनने पहिली व्यावसायिक भागीदारी जाहीर केली आहे. आर्यन भारतात D’YAVOL ब्रँड लॉन्च करणार आहे. या उपक्रमासाठी, आर्यनने जगातील सर्वात मोठ्या ब्रुअर Anheuser-Busch InBev सोबत भागीदारी केली आहे आणि देशात प्रीमियम वोडका ब्रँड लॉन्च करणार आहे. आर्यनसह त्याचे व्यावसायिक भागीदार बंटी सिंग आणि लेटी ब्लागोएवा यांनी D’YAVOL लाँच केले आहे.
View this post on Instagram
आर्यन खानने बिझनेस व्हेंचरची घोषणा केली
आर्यन खानने इंस्टाग्रामवर Diavol लाँच करण्याची घोषणा केली. ब्रँड प्रथम D’YAVOL वोडका लाँच करेल आणि नंतर इतर स्पिरिटमध्ये विस्तारित करेल. बल्गेरियनमध्ये ‘डायव्होल’ म्हणजे ‘सैतान’. आर्यनने त्याचे भागीदार बंटी सिंग आणि लेटी ब्लागोएवा यांच्यासोबतच्या छायाचित्रासह सोशल मीडियावर त्याच्या नवीन व्यवसायाची घोषणा केली.
आर्यन खानने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.- “या लाइफस्टाइल लक्झरी कलेक्टिव्हच्या संकल्पनेला जवळपास 5 वर्षे झाली आहेत. डी’यावोल शेवटी आला आहे…”
View this post on Instagram
आर्यन खानने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, त्याने एका वेब सीरिजचे स्क्रिप्टिंग पूर्ण केले आहे. प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटनुसार आर्यन याचे दिग्दर्शन करणार आहे. ही मालिका पुढच्या वर्षी फ्लोरवर जाण्याची शक्यता आहे.
आर्यनची बहीणही डेब्यू करणार
शाहरुख खानची मुलगी आणि आर्यनची धाकटी बहीण सुहाना खानही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. सुहाना झोया अख्तरच्या नेटफ्लिक्स चित्रपट द आर्चीजमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर यांचाही हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होईल.