मुंबई – अलीकडेच शाहरुख खानने माँ वैष्णोदेवीच्या दरबारात हजेरी लावली होती. त्याचवेळी आमिर खान त्याच्या ऑफिसमध्ये कलश पूजन करतानाचे फोटोही समोर आले होते. खान कलाकारांची ही भक्ती भावना युजर्सना आवडली आणि त्यांनी दोन्ही कलाकारांचे कौतुक केले.
यावर आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची प्रतिक्रिया आली आहे. भाजपचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाविरोधात आघाडी उघडली आहे.
भाजपच्या मंत्र्याला त्यांच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आले,’शाहरुख खान वैष्णो देवीला दर्शनासाठी गेला, आमिर खानकलश पूजा करताना दिसला, हा कसला बदल? यावर उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले,’समाज आता जागृत झाला आहे. ही गोष्ट सगळ्यांना समजली असेल तर बरे. प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार पूजा करण्याचा अधिकार आहे, ज्याने त्याच्या श्रद्धेनुसार पूजा करावी. पण कोणाच्याही भावना दुखवू नका, एवढेच.’
दरम्यान, पठाण यांच्याविरोधात सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. पठाण पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अजून प्रदर्शितही झालेला नाही की एवढा गदारोळ उठला आहे. चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग खूपच सेन्स्युस आहे. यामध्ये दीपिका ग्लॅमरस दिसत आहे. संपूर्ण गाण्यात ती मोनोकिनी किंवा बिकिनीमध्ये दिसली आहे. दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून खळबळ उडाली आहे. हा वाद किती काळ टिकतो हे पाहावे लागेल.