मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
मात्र, सध्या अभिनेत्री तिच्या नवीन शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शो मुळे चांगलीच चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. मलायकाला नेहमीच हटके काहीतरी करण्याची सवय आहे. मलायका नेहमी आपला वेगळा रुबाब सर्वांना दाखवून देत असते. या नव्या शोमध्ये देखील मलायका काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतंच या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, अभिनेत्री नोरा फतेही मलायका अरोराच्या या शोमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओ मध्ये मलायका आणि अभिनेत्री नोरा फतेही एकत्र डान्स करताना दिसून येत आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी बहुचर्चित “चल छैयां छैयां..’ या गाण्यावर जबरदस्त असा डान्स केला आहे. नोरा आणि मलायका यांचा हा डान्स चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. यामध्ये या दोघीही अतिशय मादक आणि बोल्ड लूकमध्ये दिसून येत आहे. यावेळी डान्सवेळी नोरा आणि मलायका यांनी सारखीच ड्रेसिंग देखील केलीये. हा प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मलायकाचा हा शो सुरु असून, मलायका यामध्ये आणखी काय काय गमती जमती करणार आहे, हे पाहणे महत्वाचे आहे.