इटली – बिग बॉस फेम अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच तिने अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली. यानंतर आता शहनाज इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. येथील काही फोटो तिने इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शहनाज फारच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने लाल रंगाचा टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केले आहे. यात ती निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटताना दिसत आहे. समुद्र किनाऱ्यावर तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही निसर्गाच्या जितके जवळ जाताल, तितके तुम्ही स्वतःच्या जवळ जाताल.’ याशिवाय तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे.
https://www.instagram.com/p/CtlMG-ZIidb/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CtieoGbNa7P/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, शहनाज गिल बिग बॉस 13 मध्ये झळकली होती. यात तिने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले होते. तिच्या साध्या सरळ स्वभावाने तिने अनेकांची मनं जिंकली होती. बिग बॉसमध्ये शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाची कमेस्ट्री चर्चेत आली होती. यांची जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस पडली होती. मात्र सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजने स्वत:ला सावरत पुन्हा एकदा उंच भरारी घेतली. आज शहनाज गिल ही सोशल मीडिया स्टार असून तिचे फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहनाजचे मोठे नाव झाले आहे.