-->

शाहिद कपूरचा ‘जर्सी’ दिवाळीमध्ये होणार रिलीज

शाहिद कपूरचा आगामी सिनेमा “जर्सी’ची रिलीज डेट निश्‍चित झाली आहे. हा सिनेमा दिवाळीमध्ये 5 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. “जर्सी’ हा एका अपयशी परंतु गुणवान क्रिकेट खेळाडूवर आधारित सिनेमा आहे. आपल्या मुलाच्या इच्छेखातर वयाच्या तिशीनंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करणाऱ्या खेळाडूची कथा यामध्ये असेल. 

स्वतः शाहिद कपूरने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये “जर्सी’ 5 नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. “जर्सी’ याच नावाने तेलगूमध्ये आलेल्या मूळ सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.

लॉकडाऊनच्या काळात “जर्सी’चे शूटिंग पूर्ण झाले होते. मात्र पोस्ट प्रॉडक्‍शन बाकी राहिले होते. शाहिदने फक्त 47 दिवसात हे शूटिंग पूर्ण केले आहे. संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने काम केले आहे, ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

ऐन करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात मैदानावर जाऊन आम्ही मनसोक्‍त किकेट खेळत असायचो. हे अवर्णनीय आहे. हा सिनेमा आपला सर्वोत्तम सिनेमा असेल असा शाहिदचा विश्‍वास आहे. “जर्सी’ मध्ये शाहिद बरोबर मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर देखील असणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.