पुणे जिल्हा : अज्ञाताने केलेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू

शिरुर : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे सर्कल कार्यालयासमोर मोटरसायकलवरून आलेल्या मारेकर्‍यांनी दोघांवर गोळीबार केला यात एका जणांचा मृत्यू झाला असून एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

स्वप्निल छगन रणसिंग असे या गोळीबारात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र स्वप्निल सुभाष गावडे याला गोळी चाटून गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे.

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील हॉटेल सर्कल कार्यालय समोर आज सकाळी बाराच्या सुमारास हा गोळीबार झाला असून, टाकळी हाजी गावात मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा दाखल झाला असून हा गोळीबार नक्की कोणत्या कारणावरून झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. गोळीबारानंतर दोन्ही जखमी तरुणांना शिरूर येथील चोरे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आली तेथे उपचार सुरू असताना स्वप्नील रणसिंग मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शिरूर ते पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे घटनास्थळी दाखल झाले असून या भागात असणारे सीसीटीव्ही फुटेज व हल्ला पाहणाऱ्या नागरिकांबाबत माहिती घेत असल्याचे समजते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.