पुणे : शिक्षिकेचा कौटुंबिक छळ करणार्‍या पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे : विवाहित शिक्षीकेचा कौटुंबिक छळ करून लग्नात आलेल्या भेटवस्तु व विवाहितेचा पगार आऊंटवर ट्रान्सफर करून तिचा कौटुबिक छळ करणार्‍या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील कोल्फी, उदय कोल्फी, रेश्मा कोल्फी, चेताली नरके, गणेश नरके पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 33 वर्षीय शिक्षक महिलेनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसर हांडेवाडी रस्त्यावरील सनराईज अपार्टमेंट, ईसीपी वास्तु येथे घडला.

फिर्यादी मुळची नागपूर येथील असून तीने माहेरी पोहचल्यानंतर तीने नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.