Siddharth Jadhav Social Media Post| अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. मराठीसह त्याने हिंदी चित्रपट सृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप निर्माण केली आहे. यातच आता सिद्धार्थने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये सिद्धार्थच्या चित्रपटाचे स्क्रिनिंग दाखवण्यात आले.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील अनेक चित्रपटांची स्क्रिनिंग होते. यामध्ये मराठी चित्रपटांचाही समावेश आहे. अद्याप सिद्धार्थ जाधव स्टारर ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपट रिलीज झालेला नाही. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे कौतुक होत आहे. नुकतंच सिद्धार्थ इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
सिद्धार्थ जाधवची पोस्ट Siddharth Jadhav Social Media Post|
‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सिद्धार्थ जाधवचा 16 मे रोजी ‘हजार वेळा शोल पाहिलेला माणूस’ चित्रपट दाखवण्यात आला. तसेच पुन्हा 19 मे रोजी देखील दाखवण्यात येणार आहे. यासंदर्भात पोस्ट करत सिद्धार्थने लिहिले की, “आपला मराठी सिनेमा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’बद्दल खूप वेळा ऐकलं होतं. जेव्हा जेव्हा इथे आपला ‘मराठी सिनेमा’ गेलाय तेव्हा तेव्हा अभिमान वाटायचा. ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग होत आहे आणि मी त्या सिनेमाचा भाग आहे. खूप आनंद झाला आहे.”
View this post on Instagram
पुढे सिद्धार्थ लिहिलं, “‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जिथे जगभरातून गौरविलेले सिनेमे येतात आणि बघितले जातात. तिथे आपल्या ‘मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग होत आहे याचा मला खूप आनंद आहे. धन्यवाद ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपटाची टीम. खूप छान वाटतंय. असंच प्रेम ठेवा. हा सिनेमा लवकरात लवकर तुमच्यासमोर सादर व्हावा याची मी आतुरतेने वाट पाहतोय, लव्ह यू…थँक्यू…” सिद्धार्थच्या या पोस्टवरनंतर त्याच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव केला होतं आहे.
दरम्यान, बहुचर्चित ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’ १४ मेपासून सुरू झाला असून २५ मेपर्यंत असणार आहे. या फेस्टिव्हलला अनेक दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. येथे ऐश्वर्या राय-बच्चन, उर्वशी रौतेला या सारख्या अभिनेत्रींचा देखील रेड कार्पेटवर आपला ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला.
हेही वाचा:
प्रभास नव्हे…कन्नड चित्रपट निर्मात्याशी अनुष्का शेट्टी करणार ‘लग्न’ ?