पुणे : पायी जाणाऱ्या महिलेचे जबरदस्तीने हिसका मारून चैन चोरणाऱ्या मास्टर माईंडला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमोल रविंद्र आडम ( वय २४ ,शंकरनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अमोल आडम आणि सहकार्यांनी १२ ऑक्टोबर रोजी लेकटाऊन रोड बिबवेवाडी येथून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका नेली होती.
सागर संदीप शर्मा ऊर्फ भोवते (वय २०, रा. एस.आर.ए, बिल्डींग, लेक टाऊन), अमोल रविंद्र आडम ( वय २४ ,शंकरनगर, कात्रज), प्रथमेश ऊर्फे पिल्या प्रकाश ठुमके ( रा. घोटी, इगतपुरी) यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होती. यातील सागर संदीप शर्मा ऊर्फ भोवते यास यापुर्वी १९ ऑक्टोबर २०२३ ला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून दोन सोन्याच्या चैन जप्त करण्यात आल्या.
या गुन्ह्यात अमोल आडम याचा शोध घेत येत होता. पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांना अमोल आडम हा कात्रज येथील जैन मंदीराजवळ थांबला असायची माहिती मिळाली होती. आरोपी आडमला सापळा रचून अटक करण्यात आली. आडम हा भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी या पोलीस ठाण्याच्या गुन्हयांत फरार आहे.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, विक्रम सावंत, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे