Vinayak Mete – शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवगंत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात फूट पडली आहे. विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी जय शिवसंग्राम या त्यांच्या नव्या संघटनेची देखील स्थापना करणार असल्याच्या घोषणा केली.
दरम्यान रामहरी मेटे हे त्यांच्या याच नव्या संघटनेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात करणार आहेत. विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षाची जबाबदारी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे आली होती.
मात्र काही दिवसांपासून रामहरी मेटे आणि ज्योती मेटे यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होते आणि याच वादातून रामहरी मेटे हे पक्षातून बाहेर पडले आहेत.