राहुरी, (प्रतिनिधी) – सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस लैगिक अत्याचार करून लग्न लावण्यासाठी पळवून नेल्या प्रकरणी अल्पवयीन आरोपी (राहणार संक्रापूर) यास अटक करण्यात आली आहे. यात त्याला मदत केल्या प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई वैशाली मकासरे हिस अटक केली आहे.
या प्रकरणात तिला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पीडित मुलीस पळवून नेण्यासाठी होमगार्ड रमेश भास्कर मकासरे, (वय २६ वर्ष, रा चिंचोली फाटा, ता राहुरी) याने मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास आज रोजी अटक करण्यात आली असून त्याने पीडित मुलीस व आरोपीस धुळे जिल्ह्यात पाठवलेले असल्याचे समजल्याने पोलीस हवालदार शेळके व नदीम पठाण व तपास पथक पुढील तपास कामी धुळे जिल्ह्यात पाठवण्यात आलेले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.