मुंबई : बॉलीवूडमध्ये कास्टींग डायरेक्टरचे काम करणाऱ्या एकाला पकडून हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. त्याच्या तावडीतून एक मेक आर्टीस्ट आणि एका कनिष्ठ कलाकाराची सुटका करण्यात आली. वर्सोवा भागात ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या सामाजिक शाखेने नवीन प्रेमलाल आर्य याला अटक केली. एका कॉफीशॉप जवळ तो या दोन कलाकारांना 60 हजाराचे आमिश दाखवून वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, या रॅकेटची माहिती मिळाली. गेल्या काही महिन्यापासून ते कार्यरत होते. त्यात बॉलीवूड कलाकार आणि मॉडेलचा समावेश होता. या दोन्ही महिला प. बंगालमधील असून त्या दिल्लीतील अश्वीनीकुमार यांनी त्यांना मुंबईला पाठवले होते.
या प्रकरणात आर्यच्या दोन सहाय्यकांची नावे पुढे आली आहेत. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतुकीच्या कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आली असून तपास सुरु आहे, असे सामाजिक शाखेचे वरीष्ठ निरीक्षक संदेश येवले यांनी सांगितले.