मुंबई : बॉलीवूडमधील एका माजी अभिनेत्रीशी विमानात गैरवर्तन करणाऱ्या एका 41 वर्षीय व्यक्तीला विशेष न्यायलयाने तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. डिसेंबर 2017मध्ये ही घटना घडली होती.
विकास सचदेव याला बाल लैंगिक शोषण प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षा ठोठावण्यात आली. ही घटना घडली त्यावेळी पिडिता 17 वर्षांची होती. ती दिल्लीतून एअर विस्ताराच्या विमानाने मुंबईला येत होती. त्यावेळी आरोपीने पिडितेशी गैरवर्तन केले.
या युवतीने त्यावेळी समाज माध्यमांवर आपली बाजू मांडली होती. त्यात तीने म्हटले होते, दिल्लीहून मी मुंबईला विमानाने येत होते. त्यावेळी माझ्या मागे बसलेल्या व्यक्तीने हा प्रवासाचा दोन तासाचा काळ मला असह्य बनवला. मी ते फोनवर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. मात्र विमनातील उजेड फारच अंधूक असल्याने ते शक्य झाले नाही.
या अंधूक प्रकाश असणे आणखी धक्कादायक होते. हा प्रकार आणखी पाच दहा मिनिटे सुरू होता. त्यामुळे त्याच्या प्रकाराबाबत माझ्या मनात खात्री झाली. त्याने माझे खांदे दाबले. त्याचा पाय माझ्या पाठीवर तो फिरवत होता, असे तीने त्या पोस्टटमध्ये म्हटले होते.