नगर – जमिनीच्या मोजणीवरून सावेडी गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली. लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दगडाने झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन्ही गटाच्या 18 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मधुकर दयानंद भिंगारदिवे (रा. सावेडीगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जागेच्या वादातून विरोधी गटाच्या टोळक्याने लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मधुकर भिंगारदिवे, त्यांची पत्नी सिंधू व मुलगा विरेन यांना मारहाण केली. मारहाणीत मधुकर भिंगारदिवे यांच्या डोक्यात जखम झाली आहे, तर पत्नी व मुलाचा मुका मार लागला आहे. तसेच टोळक्याने दमदाटी करून तलवारीने कापण्याची धमकी दिली.
याप्रकरणी राकेश दादू भिंगारदिवे, श्रीकांत चंद्रकांत आल्हाट, सीमा उर्फ पिंकी निकाळजे, आशा दादू भिंगारदिवे, रेणुका महादू भिंगारदिवे, दीपक फकीरा पवार, आकाश फकीरा पवार (सर्व रा. सावेडी गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधी गटाच्या राकेश दादू भिंगारदिवे (रा.सध्या बोल्हेगाव, राघवेंद्र स्वामी मंदिराजवळ, मूळ रा. सावेडी गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील वादग्रस्त जागेच्या मोजणीसंदर्भात कोर्ट कमिशन बोलवले होते. त्यावेळी तेथे राकेश भिंगारदिवे गेलेले असताना त्यांच्यात वाद चालू होते. कोर्ट कमिशनचे वकील तेथून निघून गेले. याचा राग येऊन टोळक्याने दगडफेक केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाणीत राकेश भिंगारदिवे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी वीरेन मधुकर भिंगारदिवे, आकाश शालुमन जाधव, मधुकर दयानंद भिंगारदिवे, विलास दयानंद भिंगारदिवे, पद्मा विलास भिंगारदिवे, कलावती शाहू राजेश शालुमन जाधव (सर्व रा. सावेडीगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.