मुंबई – भाजप-शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रीपदाचा वाद दिवसेंदिवस चिघळत असतानाच शिवसेना आपल्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी ठेवणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत काही दिवसांपासून दररोज सकाळी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे सूचक संदेश देत असल्याची चर्चा आहे. यातच त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. हे ट्विट कोड्यात असल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं
कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहींदुष्यंत कुमार
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 7, 2019
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्यांची आज मातोश्रीवर बैठक झाली आहे.या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला महत्व प्राप्त झाल आहे.
आजच्या बैठकीत शिवसेनेकडून मोठा निर्णय येण्याची शक्यता संजय राऊत यांच्या ट्विटच्या माध्यमांतून लावले जात आहे.