नगर (प्रतिनिधी) – बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क आणि अधिकार मिळावा म्हणून क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाईंनी घेतलेले कष्ट महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या त्यागामुळेच बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे खुली झाली. मूकबधिर विद्यार्थ्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. दंत तपासणी व फळ वाटप करुन त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागातर्फे नगर शहरातील टिळक रोड वरील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयातील २५ मुलांची दंत तपासणी करून व आ. संग्राम जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. डॉ.अतुल मडावी यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिक विधाते, संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, जय सपकाळ, केतन क्षीरसागर, शरद दातरंगे, भरत गारुडकर, लहू कराळे, तुषार टाक, मुख्याध्यापक विजय आरोटे, संतोष यादव, अनिल हिवाळे, एस. एम. कर्पे, शिवाजी विधाते, ज्ञानेश्वर रासकर, राहुल रासकर, रोहित पडोळे, शुभम आंबेकर, गणेश पांढरे, रोहित इवळे, मयूर जाधव आदी उपस्थित होते.