रोम (इटली) – इटलीतील ‘सिरी ए’ या फुटबॉल लीगमध्ये फिओंरेटिना संघाकडून खेळणाऱ्या आणखी चार खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या लीगमध्ये करोनाची लागण झालेल्या खेळाडूंची संख्या 11 वर पोहचली आहे. यामुळे खेळाडूंनी सरावाला न येण्याची सूचना सीरि-एच्या डाॅक्टरांकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.
याशिवाय ‘ला लीगा’ फुटबॉल स्पर्धेमध्ये वलेंसिया संघाकडून खेळणारा फुटबॉलपटू एजेकिएल गारे सह एकूण पाच फुटबॉलपटूंची करोनाची चाचणी पॉजिटिव आली आहे. दोन दिवसांपूर्वी सेंपडोरिया संघाचे सात खेळाडूंची करोना विषाणू तपासणीसाठी करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी पॉजिटिव आली आहे.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सिरी ए’ फुटबॉल स्पर्धा 3 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. केवळ हीच नव्हे तर इटलीतील अनेक क्रीडा स्पर्धा या स्थगित करण्यात आल्या असून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.