सिडनी : नोव्हाक जोकोविचच्या नेतृत्वाखाली सर्बियाने स्पेनचा २-१ ने पराभव करत एटीपी कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. स्पेनचे नेतृत्वाची जबाबदारी रफाएल नदालकडे होती. सर्बियाने पहिल्यांदाच एटीपी कप स्पर्धा जिंकली आहे.
Champions 🇷🇸 #TeamSerbia 🏆#ATPCup pic.twitter.com/rMtXb2mBt6
— ATPCup (@ATPCup) January 12, 2020
स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा अगुतने सर्बियाच्या डुनास लॅजोविचचा ७-५, ६-१ पराभव करत १-० ने आघाडी घेतली होती, मात्र त्यानंतरच्या लक्षवेधी लढतीत जोकोव्हिचने नदालला ६-२, ७-६ असे नमवत १-१ अशी बरोबरी साधून दिली.
DJOKOVIC WINS!
🇷🇸 #TeamSerbia level the tie & we're going to a deciding doubles!#ATPCup | @DjokerNole pic.twitter.com/rfhb0rbKqy
— ATP Tour (@atptour) January 12, 2020
त्यामुळे दुहेरीची लढत महत्वपूर्ण ठरणार होती. मात्र त्या लढतीतून थकवा आल्याच्या कारणास्तव नदालने माघार घेतली.
History, MADE! 🇷🇸
The moment @DjokerNole and @troicki_viktor sealed the #ATPCup title for Team Serbia. pic.twitter.com/AMy6amLyFQ
— Tennis TV (@TennisTV) January 12, 2020
दुहेरीच्या लढतीत जोकोव्हिचने व्हिक्टर ट्रोइकीच्या साथीने स्पेनच्या फेलिसियानो लोपेज आणि पाब्लो या जोडीचा ७-५, ६-१ असा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.