नवी दिल्ली – सीबीआयने बुधवारी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय नेते भोला यादव यांना अटक केली. रेल्वेतील जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याच्या संदर्भात ती कारवाई करण्यात आली.
लालूंची सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोला यादव यांच्या अटकेची घडामोड राजदसाठी मोठा हादरा मानली जात आहे. लालू रेल्वे मंत्री असताना भोला यांनी 2005 ते 2009 या कालावधीत त्यांचे विशेष अधिकारी (ओएसडी) म्हणून कार्य केले होते. त्या काळात संबंधित घोटाळा झाला.
सोनिया गांधी-स्मृती इराणींमध्ये जोरदार शाब्दिक चकमक; सुप्रिया सुळेंची मध्यस्थी अन्…
त्यावेळी बिहारच्या पाटणामधील काही उमेदवारांना रेल्वेत नोकऱ्या देण्यात आल्या. त्याबदल्यात संबंधित उमेदवारांच्या कुटूंबीयांच्या जमिनी लालूंच्या परिवारातील सदस्यांना विकण्यात आल्या किंवा त्यांच्या नावे हस्तांतरित करण्यात आल्या. त्या प्रक्रियेत भोला यांनी महत्वाची भूमिका निभावल्याचा सीबीआयला संशय आहे.
घोटाळ्यावेळी भोला यांनीही काही जमिनीची खरेदी केल्याचे समजते. त्या घोटाळ्यावरून सीबीआयने याआधीच लालू, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि दोन कन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भाजपला राजकीय विरोध करत असल्यानेच संबंधित कारवाई झाल्याचा आरोप राजदकडून करण्यात आला.
स्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल,’राष्ट्रपती आणि देशाची माफी मागावी’