नवी दिल्ली – अधीर रंजन चौधरी यांच्या वादग्रस्त विधानावरून जोरदार गदारोळ सुरू होता व दुपारी बारा वाजता सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले. घोषणाबाजीत सोनिया गांधी यांचेही नाव घेतले जात असताना सभागृहाच्या बाहेर जात असलेल्या सोनिया भारतीय जनता पार्टीच्या खासदार रमा देवी यांच्याजवळ थांबल्या.
अधीर रंजन चौधरी यांनी अगोदरच माफी मागितली असल्याचे त्यांनी रमा देवी यांना सांगितले. त्यावेळी रवनित सिंह बिट्टू आणि गौरव गोगोई त्यांच्यासमवेत होते.
दरम्यान, सोनिया बोलत असताना भाजपच्या स्मृती इराणीही तेथे पोहोचल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माझे नाव का घेतले जाते आहे, अशी विचारणा सोनिया गांधी यांनी रमा देवी यांना केली.
तेव्हा माम मे आय हेल्प यू…आप का नाम मैने लिया, असे स्मृती इराणी म्हणाल्या. तेव्हा डोन्ट टॉक टू मी असे सोनिया गांधी त्यांना म्हणाल्या. यावेळी कॉंग्रेस आणि भाजप सदस्यांत तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र सुप्रिया सुळे आणि गौरव गोगोई यांनी वातावरण शांत केले.