बारामती : बारामती पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी तालुकाच्या 14 गणातील आरक्षण सोडत आज सकाळी कविवर्य मोरोपंत नाट्य मंदीर, नवीन प्रशासकीय भवन समोर, बारामती येथे काढण्यात आली.
या सोडत कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, निवासी नायब तहसिलदार विलास करे, तहसिल कार्यालयातील कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.
बारामती पंचायत समितीच्या गण रचनेचे आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले.
सर्वसाधारण – सुपा, शिर्सुफळ, काटेवाडी, वाघळवाडी, आणि निंबुत.
सर्वसाधारण (महिला) – पणदरे, मूढाळे, मोरगाव आणि डोर्लेवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला) – कऱ्हाटी व निरावागज.
नागरिकांचा मागास प्रवर्ग – सांगवी.
अनु. जाती – गुणवडी.
अनु. जाती (महिला) – वडगाव निंबाळकर.