राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचे दीर्घ आजारानं निधन झाले आहे. शनिवारी दुपारी वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबदल ट्विटरवरून माहिती दिली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. काही महिन्यांपूर्वी आजारी असलेल्या अमर सिंह यांनी उपचारासाठी सिंगापूर गाठलं होतं. गेल्या काही महिन्यापासून सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथंच उपचारा दरम्यान त्यांच निधन झालंय.
समाजवादी पक्षाचे ते माजी नेते आणि पक्षाचे सरचिटणीस सुध्दा होते. समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. अमिताभ बच्चन यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते. परंतु काही वर्षांपूर्वा या दोघांपासूनही अमर सिंह दुरावले होते. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अमर सिंह यांच्या नावाची नेहमीच चर्चा असायची. 

Leave A Reply

Your email address will not be published.