पंतप्रधानांनी राजस्थानातील तमाशा थांबवावा – मुख्यमंत्री गेहलोत

जयपूर – मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज पुन्हा एकदा राज्यामध्ये आमदारांच्या खरेदीसाठी घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील ‘तमाशा’ थांबवावा अशी मागणी केली.

राजस्थान काँग्रेसचे क्रमांक दोनचे नेते सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट यांचे आंदोलन भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप केलाय तर पायलट यांनी पक्षांतर्गत घुसमट होत असल्याचं सांगितलंय.

दरम्यान, आज पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री गेहलोत यांनी, पंतप्रधानांनी राजस्थानात सुरु असलेला ‘तमाशा’ थांबवावा अशी मागणी करत राज्यात घोडेबाजारीचा दर आता चांगलाच वाढलाय असा आरोप लगावला.

यावेळी बोलताना गेहलोत यांनी, “संजीवनी सहकारी संस्थेच्या कथित घोटाळ्यात गजेंद्रसिंग शेखावत यांचे नाव समोर आले आहे. कोर्टानेही यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यांनी नैतिक कारणास्तव राजीनामा द्यावा.” अशी मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.