बारामती (प्रतिनिधी)- देशात राज्यात काहीही घडो, मात्र १९९१ पासून मला बारामतीत मुस्लीम समाजाने कायम पाठींबा दिला आहे. फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही, कोणतेही काम मनापासून करण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणताही प्रसंग आला. महायुतीत असलो तरी शाहू, फुले, आंबेडकरांची विचार धारा सोडलेली नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती येथे माैलाना आझाद मंडळाच्या वतीने १५० व्यावसायिकांना साडेचार कोटीं कर्जमंजुरी पत्राचे वाटप उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून आचारसंहिता सुरु होईल. आचारसंहिता जवळपास जाहीर झाल्यात जमा आहे. अनेकांनी त्यांच्या कामाबाबत पत्र दिली आहेत. मात्र, आचारसंहिता संपल्यावर नागरिकांच्या मागण्या मार्गी लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
आज सरकारच्या वतीने मी आलो आहे. यापूर्वी काही लोकांनी तुमची मते मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्या पध्दतीने समाजाला ते दिले नाही. लवकरच लोकसभा निवडणुका लागतील. आजपर्यंत तुम्ही माझे ऐकत आलेला आहात. घड्याळाची साथ सोडलेली नाही. यंदाही तुमची साथ राहू द्या, तुमचे पवित्र मत द्या, असे भावनिक आवाहन पवार यांनी केले.
यावेळी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी हाेळकर, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, कमरुद्दीन सय्यद कासम कुरेशी, आस्लम बागवान, रशीद बागवान, मकसुद खान, इक्बाल शेख, निसार शेख, सिकंदर तांबोळी, जाकीर तांबोळी,
गालीब सय्यद, महेबूब बागवान, युसुफ इनामदार, आदम झारी, कादीर झारी, इरफान इनामदार, मौनिद्दीन इनामदार, हुसेन पठाण, अशपाक सय्यद, जलाल आत्तार, सादीक मोमीन, महेबूब सय्यद, सलिम मोमीन उपस्थित होते. सूत्रसंचालन परवेज सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन परवेज सय्यद यांनी केले. सुभान कुरेशी यांनी आभार मानले
….मी वाढायचे काम करतो
आचारसंहिता सुरु होणार असल्याचे शासकीय कामे,त्यासंबंधी मंजुरी देणे शक्य होणार नाही. नागरिकांनी मागणी केलेली कामे, नवीन कामांचे प्रस्ताव, आराखडे आदी कामांचे नियोजन करुन ठेवा. आचारसंहीता सुरु असल्याने ती कामे नंतर होतील. तुम्ही शिजवायच काम करा. मी वाढायचे काम करतो, अशी मिश्कील टीपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील यांना केली.
…सुनेत्रा पवार भावी खासदार
कार्यक्रमाचे संयोजक मुस्लीम बॅंकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उपस`थितीत मनोगत व्यक्त केले. यावेळी सय्यद यांनी सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख भाषणात केला. त्यामुळे सुनेत्रा पवार याच लोकसभेच्या उमेदवार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.