बारामती, (वार्ताहर)- अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने महाराष्ट्राची लोकधारा-लोकनृत्य या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला मुंबई मंत्रालय येथील सांस्कृतिक विभागाचे सागर रोकडे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची लोकधारा-लोकनृत्य या विषयावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांकडून धनगर गीत, गोंधळ, वारी अशा विविध प्रकारच्या गीतांचे सराव करून घेतले. प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. भीमराव तोरणे यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) , सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश जगताप होते. महाराष्ट्राची लोकधारा लोककला ही लोप पावत चाललेली आहे. ती लोकधारा जपली गेली पाहिजे, हे जपण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर, डॉ. अशोक काळंगे, डॉ. योगिनी मुळे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा, प्रा. राजेंद्र कंडरे, प्रा. विशाल मोरे, विद्यापीठ प्रतिनिधी सौरभ पांढरे उपस्थित होते. एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सूत्रसंचालन सोमनाथ कदम यांनी मानले.