ब्रायन्स्क, (रशिया) – रशियातील १४ वर्षाच्या एका मुलीने स्वैर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीने केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले. या गोळीबारानंतर या मुलीने स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्या केली. ब्रायन्स्क शहरातल्या एका शाळेमध्ये झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.
उपलब्ध झालेल्या प्रार्थमिक माहितीनुसार या मुलीने शॉटगन आपल्या बरोबर शाळेमध्ये आणली होती. तिने आपल्या वर्गातल्या अन्य विद्यार्थ्यांवर गोळीबार केला होता, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
या मुलीने हा गोळीबार का केला, हे समजू शकलेले नाही. या गोळीबाराची कारणे शोधण्यासाठी तपास अधिकारी तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधत आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या मुलीकडे शिकारीसाठी वापरतात तसा एक चाकू देखील होता, तो तिने आपल्या बूटांमध्ये लपवलेला होता, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
अमेरिकेप्रमाणे रशियामध्ये स्वैर गोळीबाराच्या घटना तुलनेने कमी घडत असतात. तेथे बंदुकीचे परवाने सहजपणे मिळत नाहीत. मात्र युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे अनेकवेळा सीमेपलिकडून होत असलेल्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी लोक ब्रायन्स्क सारख्या शहरामध्ये आपल्याबरोबर शस्त्रे बाळगू लागले आहेत,